You are currently viewing मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यात गुळदुवे येथे सोलर लाईट लोकार्पण सोहळा संपन्न

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यात गुळदुवे येथे सोलर लाईट लोकार्पण सोहळा संपन्न

सावंतवाडी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज 54 वा  वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यात विविध कार्यक्रम करण्यात आले. त्यात सावंतवाडी तालुक्यातील गुळदुवे गावात राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेच्या वतीने सोलर लाईट लोकार्पण करण्यात आली. मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनानुसार मनसे लॉटरी सेना अध्यक्ष गणेश कदम व सहसंपर्कअध्यक्ष सूर्यकांत मयेकर यांच्या माध्यमातून सोलरलाइट देण्यात आली. सदर सोलर लाईटचे लोकार्पण मनसे लॉटरी सेना तालुकाध्यक्ष राजेश मामलेकर सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपशहरअध्यक्ष शुभम सावंत, गावचे ज्येष्ठ नागरिक प्रभाकर जोशी, आनंद जोशी, फटू जोशी, राजा जोशी, विजय जोशी, विजय जोशी, संदीप केरकर, ओंकार जोशी, काशिनाथ हिरोजी, मधुकर हिरोजी, चैतन्य जोशी, संजय जोशी, साहिल जोशी, गावचे रहिवासी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 − 1 =