You are currently viewing किरण सामंत यांची निवडणुकीच्या रिंगणातून माघार 

किरण सामंत यांची निवडणुकीच्या रिंगणातून माघार 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात राजकीय उलटफेर होण्याची शक्यता

 

सिंधुदुर्ग :

 

लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीच्या मैदानातून शिवसेनेचे संभाव्य उमेदवार किरण सामंत यांनी आपण माघार घेत असल्याचे ट्विट केले आहे. शिवसेनेकडून लोकसभेचा उमेदवार म्हणून किरण सामंत यांची प्रबळ दावेदारी होती. तशा हालचाली ही सामंत यांच्याकडून सुरू होत्या. मात्र अचानक किरण सामंत यांनी मोदीजी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी व अबकी बार ४०० पार होण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत यांची माघार असे ट्विट केले आहे. मात्र काही वेळानंतर आपल्या अकाऊंट वरील हे ट्विट सामंत यांनी डिलिट केल्याने नेमके काय घडतेय याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 2 =