You are currently viewing तळेरे हायस्कूलचा दहावीचा निकाल ९७.३०%

तळेरे हायस्कूलचा दहावीचा निकाल ९७.३०%

वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळेरेचे एस.एस.सी.परीक्षेत यश

विद्यालयातून ९२.६०% गुण मिळवून विघ्नेश तावडे प्रथम

वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तळेरेतील विद्यार्थ्यांनीं दहावी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले . महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा २०२१-२२ चा निकाल आॕनलाईन, मंडळाच्या अधिकृत साईटवर नुकताच जाहिर करण्यात आला.सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात विद्यालयातून ३७ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते यापैकी ३६ विद्यार्थी उत्तीर्ण होत इयत्ता दहावी चा निकाल ९७.३० % लागला

विद्यालयात विघ्नेश विजय तावडे याने ९२.६०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच संदेश शामराव बिरादार ९०.६० % गुण मिळवत द्वितीय तर ईशा जयराम सावंत हिने ९०.२० %गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला

सर्व विद्यार्थ्यांना एस.जी.नलगे , सी.व्ही काटे , डी.सी.तळेकर , ए.बी. कानकेकर , एन . बी . तडवी , पी.एम.पाटील , पी.एन.काणेकर , व्हि. डी. टाकळे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे तसेच सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री .तु.खटावकर, कार्यकारी मंडळ सर्व पदाधिकारी , चेअरमन अरविंद महाडीक ,शाळा समिती सदस्य दिलीप तळेकर, प्रविण वरूणकर , शरद वायंगणकर , संतोष तळेकर , संतोष जठार , निलेश सोरप , उमेश कदम सर्व संस्था पदाधिकारी , मुख्याध्यापक एस.जी .नलगे , ए.एस.मांजरेकर , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , पालक , विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले

प्रतिक्रिया व्यक्त करा