You are currently viewing कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरणासाठी भाजपाचे उपोषण सुरू

कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरणासाठी भाजपाचे उपोषण सुरू

पालकमंत्र्यांनी आश्वासन देऊनही तीन महिन्यात कार्यवाही नाही!

प्रशासनाला जाग आणण्यासाठी निर्णय होईपर्यंत उपोषण छेडणार

कणकवली :

छत्रपती शिवाजी महाराज यांचा कणकवली शहरातील सर्विस रस्त्यावर असणारा पुतळा स्थलांतरित करा, या मागणीसाठी कणकवली शहर भाजपच्या वतीने शहराध्यक्ष अण्णा कोदे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत शहर भाजपाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांनी तीन महिन्यात पुतळा स्थलांतरित करण्याचे आश्वासन दिले. पण अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. पुतळा सर्व्हिस रस्त्यावर असल्याने अपघात होऊन पुतळ्याची विटंबना होऊ शकते. तसेच गेल्या आठवड्यात दोन वेळा या ठिकाणी अपघात झाले. मात्र, प्रशासन निद्रावस्थेत असल्याने हे बेमुदत उपोषण सुरू केल्याची माहिती शहराध्यक्ष कोदे यांनी दिली. यावेळी कोदे यांच्यासोबत नगरसेवक शिशिर परुळेकर, भाजपा युवामोर्चा सरचिटणीस संदीप मेस्त्री, भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष समीर प्रभुगावकर, उपसरपंच सचिन पारधीये, पप्पू पुजारे, अभय घाडीगावकर, संजय ठाकूर, राजन परब आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 2 =