You are currently viewing वटपौर्णिमा

वटपौर्णिमा

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ आदिती मसुरकर यांची अप्रतिम काव्यरचना*

* वटपौर्णिमा*

🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*शिर्षक-जतन करू संस्कृतीचे*

वटपौर्णिमेचा सण हा,
सुवासिनींच्या भाग्याचा..
भाळी कुंकू, गळा मंगळसूत्र,
सौभाग्यलेणे जपण्याचा…।। १।।

वटवृक्ष हा असे शिवरूपी,
शिवरूपी पतीस स्मरूया..
वटपौर्णिमेचे व्रत करोनी,
ईश्वर रुपास पुजूया…।। २।।

दीर्घायुषी असे हा वड,
प्राणवायू सर्वां देतो..
पतीस लाभावे उत्तम आरोग्य,
हेच मागणे देवा मागतो…।। ३।।

बिया पेरून, रोपे लावून,
वृक्षांचे चला करूया जतन..
फांद्या तोडून, पाने तोडून,
नका करूया तयांचे पतन.. ।। ४।।

सावित्रीच्या आम्ही लेकी,
संस्कृती आपली जपूया..
वटवृक्षाचे पूजन करूनी,
वृक्षसंवर्धन करूया…।। ५।।

🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

✒️सौ.आदिती धोंडी मसुरकर
तालुका-कुडाळ जिल्हा- सिंधुदुर्ग

प्रतिक्रिया व्यक्त करा