You are currently viewing माझी सिंधुताई

माझी सिंधुताई

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ अर्चना मायदेव यांची अप्रतिम काव्यरचना*

प्रिय सिंधुताई सपकाळ

माझी सिंधुताई

माझ्या माईच्या घराला
नाही हंड्या नी झुंबर
अनाथ लेकरांसाठी
तिने कसली कंबर

अनाथांची माय होणे
नाही गड्या सोपी गोष्ट
जीवन जगावे कसे ते
तिने शिकवले स्पष्ट

नाही शिकली शिकली
तरी विदेशी ती गेली
चील्या पिल्या लेकरासाठी
कडी काडी गोळा केली

नाही मागितली भिक
राही सदा स्वाभिमानी
काय वानु तुझी कीर्ती
तुझी वेगळी कहाणी

घरच्यांनी दिला त्रास
केला ज्यांनी उपहास
त्यांच्याच मुखात घाली
तिच्या घासातला घास

महाराष्ट्र भूषण माई
पुरस्कार हाती किती
सिंधू नावाची वाघीण
नाही कोणतीच भीती

आला काळा तो दिवस
गेलीस तू देवाघरी
वाट पाहती लेकरं
कधी येशील माघारी

सौ. अर्चना मायदेव
पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा