You are currently viewing भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे अभिष्टचिंतन

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे अभिष्टचिंतन

सावंतवाडी

भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी आज जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन केले. राजन तेली यांनी बाळा गावडे यांचे अभिष्टचिंतन केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
चंद्रकांत उर्फ बाळा गावडे व माजी आमदार राजन तेली हे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते, बदलत्या राजकीय समीकरणात राणे यांच्याशी एकनिष्ठ असलेले अनेक जिल्ह्यातील पदाधिकारी राणे यांच्यापासून दूर गेले, त्यात सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढविणारे बाळा गावडे व राजन तेली हेही राणे यांच्यापासून दूर गेले. कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राणे यांच्या जवळ पुन्हा राजन तेली आले. बाळा गावडे हे काँग्रेसमध्येच राहिले आणि ते सध्या सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची धुरा सांभाळत आहेत.
बाळा गावडे यांचे राजन तेली यांनी जाहीर कार्यक्रमात आवर्जून अभिष्टचिंतन केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजकारणात कोण कुणाचा मित्र नसतो, कोण कुणाचा शत्रू नसतो याचा प्रत्यय आला. बाळा गावडे यांचे अभिष्टचिंतन मात्र राजकीय गोटात अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − eight =