You are currently viewing पणदूर ग्रामपंचायत चे आजी माजी सैनिकांना मालमत्ता…

पणदूर ग्रामपंचायत चे आजी माजी सैनिकांना मालमत्ता…

कुडाळ :

ग्रामपंचायत पणदूर ने आजी, माजी सैनिक यांना यांना मालमत्ता करात सूट मिळण्यासाठी प्रमाणपत्र देण्याबाबत निवेदन पत्र लिहिले आहे. या निवेदन पत्रात म्हटले आहे की, आपण भारत देशाच्या संरक्षण दलामध्ये काम करत आहात / केलेले आहे. याचा आम्हा पणदूर वासियाना सार्थ अभिमान आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात वास्तव करणाऱ्या ज्या ज्या आजी, माजी सैनिकांसाठी देशासाठी प्राणाची बाजी लाऊन जीवाची पर्वा न करता निस्वार्थी पणे देशाचे संरक्षण केले आहे त्यांनी केलेली देशाची सेवा लक्षात घेता या सर्व आजी, माजी सैनिक व त्यांचे कुंटुबिय यांचे मनोबल वाढविण्यासाठी व त्यांचा उचित सन्मान करण्याकरता वरील संदर्भिय शासन निर्णयानुसार आजी, माजी सैनिकांना त्यांच्या नावे असलेल्या निवासी मालमता करातून सूट लागू करण्यात आलेली आहे. तरी या योजनेचा लाभ आपण जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याकडील मालमता कर सूट प्रमाणपत्र ग्रामपंचायत पणदूर येते सादर करून आपल्या निवासी मालमत्ता करात सूट देण्यासाठी आम्हांला सहकार्य करावे असे आवाहन पणदुर ग्रामपंचायत ने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − 5 =