You are currently viewing वेंगुर्ले, सावंतवाडी व मालवण न.प.च्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रशासन सज्ज

वेंगुर्ले, सावंतवाडी व मालवण न.प.च्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रशासन सज्ज

13 जूनला आरक्षण सोडत : आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले सावंतवाडी व मालवण या तीन नगरपरीषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या हालचाली प्रशासनाने सुरू केली आहे. तिन्ही ठिकाणी १३ जून रोजी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होणार आहे. मागील निवडणुकीत थेट नगराध्यक्ष १ जागा आणि उर्वरित १७ नगरसेवक जागांसाठी निवडणूक झाली होती. मात्र यावेळी शासनाच्या नवीन धोरणानुसार आणखी दोन नगरसेवक पदे वाढणार आहेत. त्यामुळे प्रभाग रचना ही बदलली आहे. एकूण १० प्रभाग मधून प्रत्येकी २ असे मिळून २० नगरसेवक निवडले जाणार आहेत.

निवडणूक विभागाकडून जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार १३ जून २०२२ रोजी सकाळी ११ वाजता त्या-त्या नगरपरिषदेच्या सभागृहात आरक्षण काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने तिन्ही नगरपरिषदेच्या सन २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी १० प्रभागांमधून २० सदस्य जागांसाठी अनुसूचित जाती पुरुष १ जागा, सर्वसाधारण महिला १० जागा आणि सर्वसाधारण ९ जागांसाठी हे आरक्षण काढण्यात येणार आहे. या आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने नागरिकांच्या हरकती व सुचना बुधवार १५ जून ते मंगळवार २१ जून दुपारी ३ वाजेपर्यंत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांचेकडे सादर करावयाच्या आहेत. या कालावधीनंतर आलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत. हरकती व सुचना दाखल करणाऱ्या नागरिकांना सुनावणी करीता उपस्थित रहाण्यासाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे. मात्र इच्छुक असलेल्या उमेदवारांना आपल्या प्रभागात कोणते आरक्षण पडते याकडे त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + 6 =