ओरोस :
आपल्याला संस्कारक्षम पिढी घडवायची असेल तर लहान वयातच मलाना बालसंस्कार व्हायला हवेत. यासाठी प्रत्येक पाल्याच्या पालकांनी मुलांना योग्य संस्कार व्हायला हवेत. हाच उद्देश ठेवून ओरस येथे वात्सल्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून संस्कार केंद्र सुरू करण्यात आले. यावेळी अध्यक्ष नेहा परब, कृषी अधिकारी पांडुरंग हडकर, मदन परब, संजय परब, बाळ खडपकर, महेंद्र परब, निलेश ओरसकर, पूजा पटकारे, राजाराम ओरसकर, परेश परब आदी उपस्थित होते. वास्तल्य या संस्थेच्या माध्यमातून लहान मुलांना मोबाइल, इंटरनेट, टीव्ही आदी उपकरनांपासून दूर करत मैदाने व शारीरिक दृष्ट्या सक्षम बनविनारे कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत. तसेच वृक्ष लागवड,संवर्धन, विविध सामाजिक उपक्रम यामधून मुलांचा सहभाग वाढत जाणार आहे. या संस्थेच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.