You are currently viewing सावंतवाडी भाजपाकडून आमदार निलंबनाचा निषेध…

सावंतवाडी भाजपाकडून आमदार निलंबनाचा निषेध…

तहसीलदारांना निवेदन सादर

भोंगळ पद्धतीने सरकारचा कारभार चालत असल्याचा आरोप….

सावंतवाडी

राज्य सरकारने तालिबानी पद्धतीने लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षभरासाठी निलंबन केले आहे.त्याचा आज येथील कार्यकर्त्यांनी निषेध करत तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना याबाबतचे निवेदन दिले.दरम्यान जनतेच्या कोणत्याही प्रश्नांना न्याय न देता भोंगळ पद्धतीने सरकारचा कारभार चाललेला आहे,असा आरोप भाजपच्या वतीने यावेळी करण्यात आला.

यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावले, महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, नगरसेवक आनंद नेवगी, दीपाली भालेकर, महेश धुरी, केतन आजगावकर, दिलीप भालेकर, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.
त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, लोकशाहीत जनतेच्या मनातील राग व्यक्त करण्याचा अधिकार विरोधकांना असतो.पण लोकशाहीच्या संकेतांचे पालनही या सरकारला करता आलेलं नाही.सभागृहात जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटू नये यासाठी अशा अशोभनीय कृतीचा आधार या पळपुट्या सरकारने घेतला आहे. या सरकारचा निषेध आम्ही या निवेदनाद्वारे करीत आहोत. असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + 2 =