●१७ मे रोजी भेडशी येथे आरोग्य शिबीर●
●अटल प्रतिष्ठान व बाबा टोपले मिञमंडळाचे आयोजन●
सावंतवाडी
अटल प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामीण भागातील रुग्णानां आरोग्य सेवा मिळावी तसेच आरोग्यविषयक जनजागृती व्हावी आणि आरोग्याशी निगडित शासनाच्या आरोग्य सेवेचा लाभ मिळावा यासाठी आरोग्य शिबिरांच्या आयोजनाचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम हाती घेतलेला आहे.
रविवार दिनांक १७ मे २०२६ रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत श्री दामोदर हाॅल,भेडशी खालचा बाजार येथे अटल प्रतिष्ठान व बाबा टोपले मिञमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर आयोजित केलेले असून या शिबिराच्या उद्घाटनासाठी उद्घाटक म्हणून जि.प.अध्यक्ष मा.प्रमोदजी कामत हे उपस्थित राहाणार असून विशेष अतिथी म्हणून भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.जगदीश पाटील असणार आहेत.
या आरोग्य शिबीरात डॉ.अभिजीत चितारी,फिजीशियन, डॉ.राजेश नवांगुळ, स्ञिरोग तज्ज्ञ व टेस्ट टय़ूब बेबी स्पेशालिस्ट, डॉ.सौ.नेहा पावसकर-कोल्हे, नेत्ररोग तज्ज्ञ, डॉ.सागर कोल्हे,मुञरोग तज्ज्ञ, डॉ.संदिप सावंत, बालरोगतज्ज्ञ, डॉ.निखील अवधूत, अस्थिरोग तज्ज्ञ, डॉ.अनिकेत वजराटकर एम एस सर्जन, डॉ.विजय सुर्यवंशी,स्ञिरोगतंज्ञ, डॉ.संजीव लिंगवत, होमिओपॅथी हे सहभागी होणार असून या शिबीरात रुग्णांची तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात येणार आहे.आयुष्यमान भारत योजनेंतर्गत आवश्यकतेनुसार यशराज हाॅस्पिटल सावंतवाडी व चितारी हाॅस्पिटल येथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत.आयुष्यमान भारत हे कार्ड काढून देणाची सुविधापण असणार आहे.तरी भेडशी दशक्रोशीतील जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड.नकुल पार्सॅकर व बाबा टोपले मिञमंडळाचे श्री दत्ताराम टोपले यानी केलेले आहे.
