You are currently viewing केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या बैठकीत पर्यटन व्यावसायिकांनी उपस्थित राहावे – विष्णू मोंडकर

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या बैठकीत पर्यटन व्यावसायिकांनी उपस्थित राहावे – विष्णू मोंडकर

सिंधुदुर्गातील पर्यटनाच्या अडीअडचणीवर तोडगा काढण्यासाठी चर्चा…

मालवण

जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांच्या अडीअडचणी समजून त्यावर केंद्र सरकारच्या माध्यमातून तोडगा काढण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक १३ जूनला सिंधुदुर्गात येत आहे.त्यामुळे सर्व पर्यटन व्यावसायिकांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी येत असलेल्या समस्या तसेच आवश्यक असलेल्या निधीची मागणी करावी,असे आवाहन पर्यटन व्यवसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी केले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.

त्यात असे म्हटले आहे की, जिल्ह्यातील पर्यटन कुठल्याही शासकीय मदतीशिवाय आतंराट्रीय पातळीवर पोचविण्यात जिल्ह्यातील पर्यटन व्यासायिकांचा मोठा हातभार आहे .श्री नाईक मालवण येथे उपस्थित राहून जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या समजून घेणार आहेत. तसेच पर्यटन वाढीसाठी आवश्यक असलेल्या प्रकल्पासंबधी माहिती घेणार आहेत .जिल्ह्यामध्ये सागरी पर्यटन च्या सोबत कल्चर ,हिस्ट्री,मेडिकल,फूड ,जलक्रीडा, साहसीक्रीडा,ऍग्रो टुरिझम क्षेत्रात केंद्र सरकारच्या माध्यमातून स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना ,अपेक्षित आवश्यक त्या सोयी सुविधा , आवश्यक शासकीय अध्यादेश तसेच रस्ते ,पाणी,वीज या दळणवळणाच्या साधनामध्ये केंद्र सरकार ने आवश्यक सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे .तरी जिल्ह्यातील होमस्टे,जलक्रीडा ,हॉटेल,टूर तसेच सर्व प्रकारच्या पर्यटन व्यावसायिकांनि सदर कार्यक्रमात उपस्थित राहून जिल्ह्यात पर्यटन वाढींसाठी येत असलेल्या समस्या तसेच आवश्यक सरकारी मदत विषयि मागणी करावी, असे आवाहन श्री मोंडकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + 7 =