You are currently viewing त्या नराधमाचे वकीलपञ घेवू नये : मनसेची मागणी

त्या नराधमाचे वकीलपञ घेवू नये : मनसेची मागणी

चंदूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीचे वकीलपत्र घेवू नये तसेच त्याला कडक
कायदेशीर शिक्षा मिळावी ,अशा मागणीचे निवेदन आज गुरुवारी मनसेच्या वतीने इचलकरंजी बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले.

चंदूर येथील शाहूनगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर कपिल अशोक हत्तलगे या नराधमाने अत्याचार केल्याची घटना नुकतीच
उघडकीस आली होती.या घटनेनंतर संतप्त जमावाने नराधम संशयित आरोपी कपिल याच्या घरावर हल्ला करत घरातील प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान केले होते.या घटनेचे गांभीर्य ओळखून शिवाजीनगर पोलिसांनी संशयित आरोपी कपिल हत्तलगे
याला ताब्यात घेवून अटक केली आहे.दरम्यान ,या दुर्दैवी घटनेचे मोठे पडसाद विविध स्तरांतून उमटून नराधम आरोपीवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होवू लागली आहे.याच अनुषंगाने आज गुरुवारी मनसे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी इचलकरंजी बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.तसेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपी कपिल हत्तलगे याचे
वकीलपत्र घेवू नये तसेच त्याला कडक कायदेशीर शिक्षा मिळावी ,अशा मागणीचे निवेदन असोसिएशनचे उपाध्यक्ष
ॲडव्होकेट डी.‌एन.लटके व अन्य पदाधिकाऱ्यांकडे सादर केले.यावेळी मनसेचे उप जिल्हाध्यक्ष रवी गोंदकर , शहराध्यक्ष प्रताप पाटील , चंदूर शहराध्यक्ष मनोज पाटील , नरेंद्र गोंदकर ,रामा बागलकोटे ,शहाजी भोसले,् , राजेंद्र निकम , महेश शेंडे ,योगेश तिवारी ,स्मिता पवार , श्रीमती छाया कोरवी यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − 5 =