सलग पाचव्या वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम.
बोर्ड परीक्षा इ. १२ वी २०२२ चा निकाल १०० टक्के.
कुडाळ :
पुष्पसेन सावंत जुनियर कॉलेज आणि सिंधुदुर्ग ॲकॅडमीच्या मार्च एप्रिल २०२२ मध्ये झालेल्या इ.१२वी परीक्षेत विज्ञान शाखेत १९ विद्यार्थी बसलेपैकी १९ उत्तीर्ण होऊन निकाल १००%टक्के लागला. त्यापैकी १६ विद्यार्थी हे ८०% च्या वर गुणांनी तर ३विद्यार्थी ७५% गुणांनी उत्तीर्ण झाले.
विज्ञान विभागातील कु. मृदुला आचरेकर ८६.८३% प्रथम क्रमांक, कु. आस्था मर्गज ८६.३३% द्वितीय क्रमांक , तर कु. दिव्या तायडे ८५.८३% तृतीय क्रमांक, कु. रितिका सावंत ८५.३३% चौथा क्रमांक, तर कु. विराज कुलकर्णी ८४.३३% पाचवा क्रमांक पटकावला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संचालक, प्र.मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.