You are currently viewing तळेरे हायस्कूचा कला वाणिज्य शाखेचा निकाल १००%

तळेरे हायस्कूचा कला वाणिज्य शाखेचा निकाल १००%

वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळेरेचे एच.एस.सी.परीक्षेत घवघवीत यश

कला शाखेतून अमिशा पुजारे तर वाणिज्य शाखेतून आयुष घाडी , स्नेहा घाडी प्रथम

वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तळेरेतील विद्यार्थ्यांनीं बारावी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले . महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा २०२१-२२ चा निकाल आॕनलाईन, मंडळाच्या अधिकृत साईटवर नुकताच जाहिर करण्यात आला. यामध्ये विद्यालयातील सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत इयत्ता बारावी कला शाखेचा निकाल १००% तर वाणिज्य शाखेचाही निकाल१००% लागला

विद्यालयात कला शाखेतून अमिशा विठ्ठल पुजारे हिने ६५.००%गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तर सानिका चंद्रकांत घाडी ६०.५०% ,नरेश प्रकाश शिंगे ६०.००% यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला

तसेच ७४. ३३% गुण मिळवून आयुष गणेश घाडी , स्नेहा भरत घाडी वाणिज्य शाखेतून विद्यालयात प्रथम , हेमांगी संजय नेवरेकर७२.६७ % गुण मिळवून द्वितीय तर , विघ्नेश राजेंद्र चव्हाण तृतिय क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाला

सर्व विद्यार्थ्यांना प्राध्यापक ए.एस. मांजरेकर , ए. बी. कानकेकर , एन . बी . तडवी , ए.पी. कोकरे , एन. पी गावठे , व्ही. व्ही केसरकर या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे तसेच सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री .तु.खटावकर, कार्यकारी मंडळ सर्व पदाधिकारी , चेअरमन अरविंद महाडीक ,शाळा समिती सदस्य दिलीप तळेकर, प्रविण वरूणकर , शरद वायंगणकर , संतोष तळेकर , संतोष जठार , निलेश सोरप उमेश कदम सर्व संस्था पदाधिकारी , प्राचार्य एस.जी .नलगे , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , पालक , विद्यार्थी व ग्रामस्थ यांनीअभिनंदन केले

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 4 =