You are currently viewing प्राध्यापकांचे मानधन ‘युजीसी’च्या निकषानुसार वाढणार, ५०% टक्के पद भरतीलाही परवानगी

प्राध्यापकांचे मानधन ‘युजीसी’च्या निकषानुसार वाढणार, ५०% टक्के पद भरतीलाही परवानगी

राज्यातील महाविद्यालयातून तासिका तत्वावर शिकविणाऱ्या प्राध्यापकांसाठी खुशखबरी आली आहे. तर तासिका तत्वावरील प्राध्यापकांचे मानधन विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषानुसार वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णत आला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आज निर्णत घेण्यात आला. त्याचबरोबर विद्यापीठांचे आकृतिबंध तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देत ‘नॅक’ (राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषद) मानांकन असणाऱ्या महाविद्यालयांना ५० % पद भरतीला परवानगी दिली जावी, गुणवत्तापूर्ण शिक्षणात कोणतीही तडजोड करु नये, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांची भरती प्रक्रीया व तासिका तत्वावर (सीएचबी) कार्यरत प्राध्यापकांच्या दरमहा मानधनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ‘व्हीसी’च्या माध्यमातून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार सुधीर तांबे, आमदार सतिश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार किरण सरनाईक, आजी आमदार अमरसिंह पंडीत, संजय खोडके, सामान्य प्रशासन विभागाचे (सेवा) अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी, उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक धनराज माने, महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड टिचर्स असोसिएशनचे (मुप्टा) सुनिल मगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा