You are currently viewing डॉ. श्रीपाद कशाळीकर यांचा सावंतवाडी लायन्स क्लब व कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने सन्मान

डॉ. श्रीपाद कशाळीकर यांचा सावंतवाडी लायन्स क्लब व कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने सन्मान

सावंतवाडी :

 

फॅमिली फिजिशियन ज्येष्ठ डॉ. श्रीपाद जनार्दन कशाळीकर यांच्या दवाखान्याला यावर्षी तब्बल ६० वर्षे पूर्ण झालीत. ७ जून १९६२ रोजी सालईवाडा इथं हा दवाखाना त्यांनी सुरू केला होता. गोरगरीबांचे डॉक्टर अशी त्यांची ख्याती असून रुग्णसेवेला प्राधान्य देऊन सातत्याने ६० वर्षे त्यांनी या दवाखान्यातून रुग्णसेवा केली.

यानिमित डॉक्टर श्रीपाद जनार्दन कशाळीकर यांचा सावंतवाडीचे लायन्स क्लब व कोकण मराठी साहित्य परिषदेच्या शाखेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी क्लबचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक, सचिव अमेय पई, खजीनदार प्रसाद राऊत, अशोक देसाई, विद्याधर तावडे, बाळ बोर्डेकर, संदेश परब, राजन पोकळे, नरेंद्र देशपांडे, डॉ. गोविंद जाधव, संतोष चोडणकर, डॉ. उमेश मसुरकर, डॉ. सुबोधन कशाळीकर, तर कोमसापचे अध्यक्ष संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, माजी अध्यक्ष सुभाष गोवेकर, राजू तावडे, प्रज्ञा मातोंडकर, मंगल नाईक, निरवडे सरपंच हरी वारंग, संजय तानावडे आदी उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा