You are currently viewing गणेशोत्सवापूर्वी चिपी विमानतळावर विमानांची संख्या वाढवा ; नाईट लँडिंगही सुरू करा – आमदार नितेश राणे

गणेशोत्सवापूर्वी चिपी विमानतळावर विमानांची संख्या वाढवा ; नाईट लँडिंगही सुरू करा – आमदार नितेश राणे

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली आहे. या भेटीत गणेशोत्सवापूर्वी मुंबई ते चिपी विमानतळावर विमानांची उड्डाणे वाढवण्या बरोबरच पर्यटन वाढीसाठी चिपी विमानतळावर नाईट लँडिंगला मान्यता देण्याची मागणी करण्यात आली आहे.

आ. नितेश राणे यांनी याबाबतची माहिती ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे. नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना आपण भेटलो. त्यांना गणपती उत्सवापूर्वी मुंबई ते चिपी विमानतळापर्यंतच्या फ्लाइट्सची संख्या वाढवण्याची विनंती केली आणि नाईट लँडिंग सुविधेलाही परवानगी द्यावी, ज्यामुळे पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असे आ. राणेंनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा