विचित्र अपघातात तिघांचा मृत्यू

विचित्र अपघातात तिघांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीमध्ये एका विचित्र अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरुच असल्याचं चित्र असून पावसाळ्यात अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालल्याचं दिसून येत आहे. दिंडोरीमध्ये आर्टिका गाडीवर झाड कोसळून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.

दिंडोरी जिल्ह्यात वलखेड फाट्याजवळ ही दुर्घटना घडली. एका आर्टिगा कारमधून पाच जण प्रवास करत होते. त्यांची गाडी वलखेड फाट्याजवळ आली असताना रस्त्यातील झाड खाली कोसळलं. त्याचवेळी त्यांची गाडी त्या झाडाखालून पुढे जात होती. हे झाड नेमकं त्या गाडीवर कोसळल्यामुळे गाडीतील तिघांचा मृत्यू झाला, तर इतर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.

या कारमधून तीन शिक्षक प्रवास करत होते. या अपघातात तिघांचाही मृत्यू झाला. दत्तात्रय बच्छाव, किशोर सूर्यवंशी आणि नितीन तायडे या शिक्षकांचा अपघातात मृत्यू झाला. हे तिघंही सुरगाणा तालुक्यातील अलंगून शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. अचानक घडलेल्या या घटनेमुळे काही कळायच्या आतच या तिघांना आपले प्राण गमावावे लागले.

प्रतिक्रिया व्यक्त करा