You are currently viewing भारतीय जनता पार्टी वैभववाडी तालुक्याच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

भारतीय जनता पार्टी वैभववाडी तालुक्याच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

भाजप सिंधुदुर्ग जिल्हा व वैभववाडी तालुका पदाधिकारी यांची उपस्थिती

वैभववाडी-

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 297 वी जयंती वैभववाडी तालुका भाजप कार्यालय येथे मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमापूजन करून भाजप पदाधिकाऱ्यांनी अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. वाभवे वैभववाडी नगरपंचायत नगराध्यक्षा नेहा माईनकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला, याप्रसंगी भाजप जिल्हा महिला सरचिटणीस स्नेहलता चोरगे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास थोडक्या शब्दात मांडला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष माजी पंचायत समिती सभापती भालचंद्र साठे, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडी नवलराज काळे, युवा जिल्हा उपाध्यक्ष बंड्या मांजरेकर, स्वप्निल खानविलकर, वाभवे वैभववाडी नगरपंचायतीचे नगराध्यक्षा नेहा माईनकर उपनगराध्यक्ष संजय सावंत, आरोग्य शिक्षण संस्कृती सभापती रेवा बावदाने, बांधकाम सभापती विवेक रावराणे, महिला व बालकल्याण सभापती सुंदरी निकम, नगरसेवक रोहन रावराणे, नगरसेविका सौ वळवी, नगरसेवक राजन तांबे, नगरसेविका सौ संगीता चव्हाण, भारतीय जनता पार्टी महिला तालुकाध्यक्ष प्राची तावडे, भारतीय जनता युवा मोर्चा वैभववाडी तालुका अध्यक्ष किशोर दळवी, खांबाळे शक्ती केंद्रप्रमुख प्रकाश पाटील, कोकिसरे शक्ती केंद्र प्रमुख प्रदीप नारकर, शुभांगी पवार, भाजप कार्यालय संपर्कप्रमुख आनंद फोंडके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा