डॉ. अशोक मोरे
प्रत्येकाने किमान एक तरी रोप घराजवळ किंवा उपलब्ध जागेत लावावे व त्याचे मनापासून संगोपन करावे, शिवाय सजीव सृष्टीचं अस्तित्व अनंत काळापर्यंत टिकवून ठेवायचे असेल, तर वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाला दुसरा पर्याय नाही. असे प्रतिपादन ‘येरळामाई जनसहयोग फाउंडेशन, हणमंत वडिये’ चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. अशोक मोरे सर यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हणमंत वडीये ता. कडेगांव (सांगली) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, संलग्न लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय, सोनसळ- हिंगणगांव, यांच्या विशेष प्रयत्नातून व ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक जोड-२०२२-२३, केंद्र- कृषि महाविद्यालय, कडेगांव यांच्या माध्यमातून हणमंत वडीये येथे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कृषी संबंधित उपक्रम राबविण्यासंदर्भातील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हणमंत वडीये येथे राबविण्यात येत असलेल्या उपक्रमासंदर्भात कृषी महाविद्यालय, कडेगांवचे प्राचार्य डॉ. डी. एम. सावंत, उपप्राचार्य डॉ. आर. एम. पवार व RAWE- AIA-२०२२-२३ चे समन्वयक डॉ सी. डी. औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार्थ इंदलकर, तेजेस होले, अविनाश शेवाळे, श्रेयानंद कारदगे, संग्राम खताळ, नितेश चव्हाण, विशाल चव्हाण या कृषीदूतांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.
या कार्यक्रमासाठी गावचे उपसरपंच श्री. विक्रम मोरे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. राहुल गुरव, श्री. एकनाथ मोरे, श्री. संपत मोरे, उद्धव मोरे, जोतीराम मोरे तसेच गावचे पोलीस पाटील श्री. अंकुश पाटील व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.