You are currently viewing डॉ.पंजाबराव देशमुख अकादमी व मिशन आयएस फाउंडेशन तर्फे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सहभागी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे विनामूल्य वितरण

डॉ.पंजाबराव देशमुख अकादमी व मिशन आयएस फाउंडेशन तर्फे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सहभागी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे विनामूल्य वितरण

अमरावती

सहा जून रोजी असलेल्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी व मिशन आयएएस फाउंडेशनतर्फे मिशन आयएएसमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे विनामूल्य वितरण दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आलेले आहे . अमरावती ते मार्डी रोड वरील ग्रीन सर्कल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिरात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध संशोधक प्राचार्य डॉ. व्ही.टी.इंगोले हे राहणार असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून अमरावती विभागाचे माजी विभागीय कोषागार उपसंचालक श्री दीपक केदार व अमरावती जिल्हा परिषदेचे माजी उपमुख्यकार्यकारी श्री बी.जी.सोमवंशी हे उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमात प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी संपादित केलेल्या मी आयएएस अधिकारी होणारच या पुस्तकाचे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त प्रकाशित प्रकाशन होणार असून या पुस्तकांमध्ये सुप्रसिद्ध आयएएस अधिकारी श्री विकास खारगे पोलीस अधीक्षक श्रीमती श्वेता खेडकर गौरव राय सुनील शर्मा सुधाकर शिंदे राहुल पांढरे डॉ. सागर डोईफोडे विवेक भस्मे बच्चन सिंग कुणाल खेमनार नितेश पाचोड अमोल कदम एम डी सिंह प्रेरणा देशभ्रतार डॉ. अभिजीत शेवाळे पुनम ठाकरे गौरव अग्रवाल डॉ. बिपिन इटनकर विजय राठोड आदेश तितरमारे ऋषिकेश पत्की किरण कोरडे अबोली नरवडे या आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांच्या यशोगाथा प्रकाशित करण्यात आले आहे .या पुस्तकाचे देखील याप्रसंगी विनामूल्य वितरण होणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख अकादमीने आयोजित करण्यात आलेल्या सात दिवसाच्या स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिराच्या निमित्ताने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रकाशनार्थ प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी अमरावती

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − seven =