You are currently viewing आंबेरी चेकपोस्टनजिक ट्रॅक्टर पलटी होवून अपघात; चालक गंभीर जखमी

आंबेरी चेकपोस्टनजिक ट्रॅक्टर पलटी होवून अपघात; चालक गंभीर जखमी

देवगड

आंबेरी चेकपोस्टनजिक ट्रॅक्टर पलटी होवून झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालक सावळाराम पियाराम(४८) रा.असूरे हा गंभीर जखमी झाला आहे..हा अपघात शनिवारी सकाळी ९.१५ वा.सुमारास रत्नागिरीकडे जाणाऱ्या सागरीमार्गावर आंबेरी चेकपोस्टनजिक झाला.

याबाबत मिळालेल्या माहितीनूसार, सावळाराम पियाराम हा शनिवारी सकाळी ट्रॅक्टर ने राजापूरहून सौंदाळेच्या दिशेने जात होता.आंबेरी चेकपोस्टनजिक ट्रॅक्टर वरील ताबा सुटून ट्रॅक्टर रस्त्यानजिकच्या खोलगट भागात पलटी झाला.या अपघातात चालक पियाराम हा ट्रॅक्टर च्या पुढील भागात अडकून पडला होता.

अपघात झाल्याचे समजताच आंबेरी चेकपोस्टचे पो.कॉ.श्रीनाथ जाधव यांच्यासह रत्नकांत बांदिवडेकर, श्री.आंबेरकर, तेली आदींनी तात्काळ मदतकार्य राबवून जखमी पियाराम याला सुखरूप बाहेर काढले.या अपघाता पियाराम याच्या हाताला व कानाला गंभीर दुखापत झाली होती.त्याला रिक्षाने तात्काळ उपचारासाठी पडेल प्रा.आ.केंद्रात दाखल करण्यात आले.प्राथमिक उपचारानंतर देवगड ग्रामीण रूग्णालयात व तेथून उपचारासाठी ओरोस जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.अपघाताची नोंद विजयदूर्ग पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 2 =