पालकमंत्री नितेश राणेंकडून परब कुटुंबीयांचे सांत्वन
मसुरे मर्डे येथे सरोज परब यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक; दुःखात सहभागी असल्याचे सांगितले
मसुरे :
महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी रविवारी सायंकाळी मसुरे-मर्डे येथे शिवाजी परब यांच्या निवासस्थानी भेट देऊन परब कुटुंबीयांचे सांत्वन केले.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. सरोज शिवाजी परब यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पालकमंत्री नितेश राणे यांनी परब कुटुंबीयांची भेट घेत शोक व्यक्त केला. यावेळी त्यांनी परब कुटुंबीयांच्या दुःखात आपण आणि संपूर्ण पक्ष सहभागी असल्याचे सांगत कुटुंबीयांना धीर दिला.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा परिषद सदस्या सौ. क्षमा हडकर, वेरली सरपंच धनंजय परब, घुमडे उपसरपंच राजू सावंत, मसुरेचे माजी सरपंच संदीप हडकर, माजी उपसरपंच राजेश गावकर, मालोंडचे माजी उपसरपंच जितेंद्र परब, राहुल परब, गणेश परब, उमेश माने, रोहेश गावकर, तात्या हिंदळेकर, पुरुषोत्तम शिंगरे, यासिन सय्यद आदी उपस्थित होते.
