You are currently viewing स्वप्न

स्वप्न

स्वप्न

स्वप्न किती सुंदर असतात..
दाट काळोखी रात्र दिसतानाही..
पहाट होऊन उजेड येईल..
अशीच आशा दाखवतात.

स्वप्न किती सुंदर असतात..
आकाश दूरवर असतानाही,
पांढऱ्या शुभ्र ढगांसोबत,
अवकाशाची सहज सैर घडवतात.

स्वप्न किती सुंदर असतात..
कोमेजलेली फुले गळून पडतानाही,
आयुष्य खुलणाऱ्या कळीसारखं,
नाजूक सुंदर हसरं भासवतात.

स्वप्न किती सुंदर असतात..
तिच्या मनात कुणीतरी असतानाही,
तिचा चेहरा नजरेसमोर आणत,
उगा मनास तिच्यासाठी झुरवतात.

स्वप्न किती सुंदर असतात..
कुणीतरी साथ सोडून गेल्यावरही,
पुन्हा एकदा सोबत राहण्याच्या,
न सुटणाऱ्या मोहात अडकवतात.

खरंच…
स्वप्न किती सुंदर असतात..
प्रत्यक्षात न भेटणारं…. काहीही,
नकळत…
स्वप्नात देऊन जातात…
जीवन जगायला शिकवतात…

*(दीपी)*
*दीपक पटेकर*
#८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 15 =