*काव्य निनाद साहित्य मंच तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आकाश पांघरुनी*
आकाश पांघरुनी
नटली निसर्गराणी
वेलीतला सुगंध
गातो सुरेख गाणी……१
उडती थवे नभात
गाती पहा निवांत
घरट्यात पक्षी येता
घेतील झोप शांत …….२
आकाश पांघरुनी
दवबिंदू मुक्त झाले
वाटे मुक्या जीवाचे
अश्रूच हे निमाले…..३
आकाश पांघरुनी
जग शांत झोपलेले
वाटे मनास माझ्या
मम् स्वप्न भंगलेले ….…४
प्रतिभा पिटके
अमरावती