You are currently viewing लोकराज्य मंचाची कार्यकारिणी जाहीर

लोकराज्य मंचाची कार्यकारिणी जाहीर

वेंगुर्ला :

लोकराज्य मंच कार्यकारिणीची बैठक नुकतीच मंचच्या कार्यालयात लोकराज्य मंचचे प्रमुख श्रीनिवास गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत नूतन कार्यकारिणी निवड करण्यात आली यात अध्यक्षपदी सर्वानुमते श्रीनिवास गावडे यांची निवड करण्यात आली. तसेच यावेळी उपाध्यक्षपदी आनंद मोचेमाडकर, सचिव राजेश परब, महिला प्रतिनिधी श्रेया मयेकर तर सदस्य म्हणून डॉक्टर रूपाली पाटील, दशरथ नाईक, शेखर चोपडेकर, सुनील परभणी यांची निवड करण्यात आली. ग्रामीण भागातही मंचचे कार्य सुरू करण्यात आल्याचे गावडे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × one =