You are currently viewing इन्सुली येथील कारच्या धडकेत पादचारी ठार तर अन्य एक गंभीर…

इन्सुली येथील कारच्या धडकेत पादचारी ठार तर अन्य एक गंभीर…

बांदा

मुंबई गोवा महामार्गावरील इन्सुली कुडवटेंब येथे पुण्याहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या कारने पादचाऱ्याना धडक दिली. या धडकेत इन्सुली कुडवटेम्ब येथील महादेव वसंत झाट्ये (वय ४५) हे जागीच ठार झाले. तर विलास कुडव हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.या कारमधील युवक पर्यटनासाठी गोवा येथे जात होते. तर पादचारी दोघेही रस्त्याच्या कडेला उभे होते. हा अपघात आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडला. घटनास्थळी बांदा पोलीस दाखल झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मोटार चालक हे सुसाट वेगात होते. अपघातातील मयत व जखमी हे रस्त्याशेजारी गप्पा करत उभे होते. मोटार चालकाने झोपेत भरधावं वेगात दोघांनाही जोरदार धडक दिली. वसंत झाटये यांना तब्बल १५ ते २० फूट फरफटत नेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर कुडव यांच्या हाताला व पोटाला गंभीर दुखापत झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा