सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोवतालकार नावाजलेले मालवणी कविता विनय सौदागर यांची अप्रतिम काव्यरचना
माझं येणं राह्यलंच
तुझं बोलावणं नाही
सांगून तसं झालय तरी
अजून राहिलंय काही
तसे बोललो नव्हतोच
कबूल नव्हते केले
स्वभावातल्या संकोचाने
दिस अलगद नेले
सरत चाललाय काळ
भलत्या गावातून
वाटतं हलके यावी
शीळ रानातून
पाय झालेत जड मग
भेट कशी होईल
प्राक्तनाच्या झुल्याला
कोण झोका देईल
बस, काही उपाय नाही
ढकलून देतो काळा
तरी आठवण येतेच
दिसा चार वेळा.
*विनय सौदागर*
आजगाव, सावंतवाडी.
9403088802