You are currently viewing भक्तिभाव

भक्तिभाव

उशीर जरी झाला तरी,
रागवू नकोस कधी.
येईन तुझं भेटाया,
कधीतरी अधिमधी.

हृदयात आहे भक्ती,
नजरेत तुझी काया.
ठेव तुझ्या भक्तावरी,
अगाध तुझी माया.

नमतो तुझ्या चरणी,
जिथे असतो तिथून.
पावन होत असेलच,
माझा नमस्कार इथून.

भक्ती तुझी भगवंता,
माझ्या नसानसात आहे.
डोळे मिटताक्षणी देवा,
भक्तीचा महापूर वाहे.

आशीर्वाद तुझा कृपेचा,
अमुच्या माथ्यावरी राहो.
सेवेत तुझ्याच रे सारा,
हा जन्म अमुचा जावो.

(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − fourteen =