सावंतवाडी :
कोरोनामुळे कित्येक सामान्य व्यक्तींना रोजगाराला मुकावे लागले आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. या संकट संकटात अनेकांचा धीर खचला. मात्र, सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील राजश्री शेटकर या महिलेने धाडस दाखवत मातीच्या भांड्यांचा व्यवसाय सुरू केला. पाण्यासाठी बॉटल माठ, ग्लास, मातीची भांडी, कुंड्या,तु ळशी, असे विविध वस्तू विकत आहेत.
सावंतवाडी- शिरोडा मार्गावर घाटीच्या पायथ्याशी राजेश्री शेटकर टपरीवजा स्टॉल लावून ही मातीची भांडी विकतात. त्यांनी दाखवलेली जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी वाखाणण्याजोगी आणि इतरांना प्रेरणादायी आहे .मातीच्या भांड्यात केलेला स्वयंपाक रुचकर तसेच पौष्टिक असतो. अन्नपदार्थामधील पोषक घटक आणि जीवनसत्त्वे या मातीच्या भांड्यात टिकतात. त्यामुळे मातीच्या भांड्यांना महत्त्व आहे उन्हाळ्यात मातीच्या बॉटल व माठामधील पाणी नैसर्गिकरीत्या थंड राहत असल्याने याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.