You are currently viewing जय भवानी युवा प्रतिष्ठान उसप ग्रुपने शिवजयंतीचे औचित्य साधुन जोपासली सामाजिक बांधिलकी

जय भवानी युवा प्रतिष्ठान उसप ग्रुपने शिवजयंतीचे औचित्य साधुन जोपासली सामाजिक बांधिलकी

उसप हायस्कूलला केले बेंचचे वितरण

दोडामार्ग
शिवजयंतीचे औचित्य साधत जय भवानी युवा प्रतिष्ठान ग्रुप उसप ने बापूसाहेब देसाई विद्यालय उसप हायस्कूलला बेंचचे वितरण केले. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे नक्कीच देणं लागतो, प्रत्येक माणूस काहीना काही आपल्यापरीने कार्य करत असतो. हे कार्य करत असताना चांगल्या कामासाठी खारीचा वाटा उचलत असतो, याचीच प्रचिती  उसप येथे अनुभवायला आली.

नेहमीच या ग्रुप ने समाज विधायक कार्य करत उसप हायस्कूल ला पंधरा बेंचेस चे वितरण करत विद्यार्थ्याची होणारी गैरसोय दुर केली. काही दिवसांपूर्वी हायस्कूल च्या प्रशासकीय विभागाकडून बेंच च्या संदर्भात पत्र प्राप्त झाले होते. याची जय भवानी युवा प्रतिष्ठान उसप ग्रुप ने तत्काळ दखल घेत दिलेले आश्वसन पूर्ण केले.
प्रशालेचे मुख्याद्यापक श्री.खांडेकर सरांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. त्यानंतर मु.पो.क्राईम ब्रांच ऑफसर श्री.सुधिर चव्हाण  यांनी श्री.छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाल‍ा सुरवात केली.

त्यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.चंद्रकांत मळीक, मा.श्री. लक्ष्मण जाधव, मा.श्री. अमोद उसपकर , मा.श्री. अर्जुन जाधव, मा.श्री.सुरेंद्र जगदाळे सर , ॲड.श्री.नितीन रेडकर, ॲड.  श्री. दाजी नाईक, श्री.दशरथ वि.मोरजकर, श्री.संतोष केरकर(गुरुजी), श्री.रामा रेडकर , श्री. औदुंबर बांदेकर, श्री. सूर्यकांत मळीक, श्री. रामचंद्र गवस, श्री.सुनिल नाईक, श्री.संतोष गवस, श्री उदय मोरजकर, श्री.शंकर नाईक, श्री. प्रविण वि.गवस, श्री. संदेश रेडकर, श्री. निलेश गवस श्री.रत्नाकर गवस आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − sixteen =