You are currently viewing स्वर्गीय वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार पार्थ गोसावीयास जाहीर

स्वर्गीय वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार पार्थ गोसावीयास जाहीर

सिंधुदुर्गनगरी

विभागीय परीक्षा मंडळातून सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वर्गीय वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. कोविड -19 च्या कालावधीमूळे सदर पुरस्काराची रक्कम लाभार्थी विद्यार्थ्यास देण्यात विलंब झालेला होता. सन 2018 -19 या शैक्षणिक वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी कु. पार्थ संतोष गोसावी इयत्ता 10 वी मध्ये विजाभज प्रवर्गातून राज्यातून प्रथम आला असल्याने त्यास स्वर्गीय  वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार जाहीर झालेला असून पुरस्काराची रक्कम  1 लाख  रक्कमेचा धनादेश व प्रमाणपत्र, उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जातपडताळणी समितीचे प्रमोद जाधव यांच्या  हस्ते देण्यात आला .

             जिल्हयतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्यातून व विभागीय परीक्षा मंडळातून प्रथम क्रमाकांने येवून अशा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन दीपक घाटे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + nine =