You are currently viewing सुख

सुख

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक-कवी निवृत्त पोलिस अधिकारी वासुदेव खोपडे यांची अप्रतिम काव्यरचना

नको शोधू रे माणसा
सुख बाजारी शेजारी
शोध शोध रे माणसा
सुखं तुझ्याच अंतरी !!

सुखं नाही रे सुखात
सुखं नाही रे दुःखात
सुखं दडले दडले
तुझा उदंड मनात !!

सुखी करूनी गांजल्या
सुखं शोधावे सुखात
दुःख भोगता भोगता
घे हरिनाम मुखात !!

मनीं क्षणिक सुखाची
धरू नकोस आसक्ती
शाश्वत सुखासाठी रे
घ्यावी संसार विरक्ती !!

नको धावू सुखा मागे
सुखं पाण्यावर लाटा
सुखा संगे दुःख येई
जैसा पुष्पांमाजी काटा !!

सुख नाही राना वना
नाही मस्जिदी मंदिरी
शोध शोध रे माणसा
सुखं तुझ्याच अंतरी !!

वासुदेव माहादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक(सेनी)
अकोला 9923488556

प्रतिक्रिया व्यक्त करा