You are currently viewing मर्म

मर्म

जागतिक साहित्य कला व्यक्तिमत्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी निवृत्त पोलीस अधिकारी श्री.वासुदेव खोपडे यांची अप्रतिम काव्यरचना

कसं गाऊ तुह्या म्होरं
देवा जीवनाचं गाणं
कधी दुःखात डुंबलो
कधी न्हाली रे सुखानं !!

देवा असं कसं देल
तू ह्या जगण्याचं दान
जीन जगता जगता
कसं हसणं रडणं !!

आडदांड देहामंदी
देला ईवलासा जीव
जीवन जगण्यासाठी
संगे माया अन हाव !!

भोग भोगता भोगता
गेली निघुनिया वेळ
पाप-पुण्याचा रे देवा
न्हाई कयला रे मेळ !!

बालपणात खेळलो
जवाणीत मी रंगलो
न्हाई रामनाम ओठी
देवा तुले रे भुललो !!

जीवासाठी सुखासाठी
लय केला देवधर्म
नाही पाळला रे देवा
खरा माणसाचा धर्म !!

स्वार्थापाई मोहापाई
लय केले नीच कर्म
न्हाई कयलं रे देवा
खरं जीवनाचं मर्म !!

वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक(सेनी)
अकोला 9923488556

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 1 =