You are currently viewing नाईलाज माझा …

नाईलाज माझा …

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्राध्यापिका सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*नाईलाज माझा …*

नाईलाज माझा धर्म आहे,पोटाची खळगी कर्म आहे
लक्तरे टांगणे वेशिला मम व्यवसायाचे मर्म आहे…

बदनाम किती ही करा तुम्ही
तुमच्या कर्माचे फलित आहे
मी गरज तुमची नित्याची
म्हणूनच पहा दलदलीत आहे….

तुम्ही बना राम अहल्या बनते
तुम्ही बना राम शबरी बनते
तुम्ही बना कृष्ण राधा बनते
मी मीरा पुजारी तुमची आहे….

लक्तरे कुणाला हवी हवी?
मी आई आहे नित्य नवी
मी बहिण आत्या काकी मामी
मी याज्ञसेनी पावन आहे ….

मी सीता कुंती गांधारी
मी एकनिष्ठ हो जौहारी
मी जीजा येसू नि तारा ही
कल्पना चावला आज आहे….

का करता माझी बदनामी
कर्दमी कुणी का हौसेने?
मम काळीजमाया गुणी मुले
पोसणे तयांना कर्म आहे ….

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: ४ जानेवारी २०२३
वेळ : सकाळी ८/२३

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + 10 =