You are currently viewing युपीएससी परीक्षेत देवगड येथील रोहन कदम यांनी मिळविले घवघवीत यश

युपीएससी परीक्षेत देवगड येथील रोहन कदम यांनी मिळविले घवघवीत यश

आ. नितेश राणे यांनी केले अभिनंदन

वैभववाडी

युपीएससी परीक्षेत देवगड गढीताम्हाणे येथील रोहन रोहिदास कदम यांनी उज्वल यश संपादन केले आहे. कणकवली देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी रोहन कदम यांचे अभिनंदन केले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी 2022 चा निकाल 30 मे रोजी जाहीर झाला आहे. या परीक्षेत गढीताम्हाणेतील रोहन रोहिदास कदम हे (295) उत्तीर्ण झाले आहेत. रोहन कदम यांनी देवगड तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे. या सिंधुदुर्गच्या सुपुत्राचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. उज्वल यश संपादन करणाऱ्या रोहनचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा असे नितेश राणे यांनी ट्वीट करत म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा