You are currently viewing बांद्यातील नाबर स्कूलच्या रेखाकला परिक्षेचा निकाल १०० टक्के…

बांद्यातील नाबर स्कूलच्या रेखाकला परिक्षेचा निकाल १०० टक्के…

बांदा

येथील व्ही.एन. नाबर मेमोरिअल इंग्लिश मिडियम स्कुल शाळेचा रेखाकला परिक्षेचा निकाल १०० टक्के लागला. ही एलिमेंटरी परिक्षा १३ विद्यार्थ्यांनी दिली. १३ विद्यार्थी उतीर्ण झाले.

यामध्ये कु.मधुरा जगदिश पाटील, कु अर्थंव विलास गवस यांना अ ग्रेड मिळाली. कु वैभव वासुदेव देसाई , कु अनुष्का अविनाश पंडिल यांना ब ग्रेड मिळाली इतर मुले क ग्रेड मध्ये उतीर्ण झाले. तसेच इंटरमिजेट ग्रेड परिक्षेला १८ विदयार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी कु पायल संतोष गावकर, कु युती वसंत राऊळ यांना ग्रेड अ ग्रेड मिळाली. कु. सेजल अजय परब, कु.तन्वी मनोज महाबळ,यांना ब ग्रेड मिळाली . पूर्वरित आठ विद्यार्थी सी ग्रेडने पास झाले. सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे कलाशिक्षक हर्षद खडपकर यांचे मार्गदर्शन मिळाले. संस्थेचे अध्यक्ष श्री.मंगेश कामत, मुख्यापिका सौ.मनाली देसाई तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .

प्रतिक्रिया व्यक्त करा