You are currently viewing सातार्डा येथे दुचाकीवरून थुंकताना तोल गेल्याने कठड्याला आदळून कणकवली येथील युवकाचा मृत्यू

सातार्डा येथे दुचाकीवरून थुंकताना तोल गेल्याने कठड्याला आदळून कणकवली येथील युवकाचा मृत्यू

सावंतवाडी

दुचाकीवरुन थुंकताना तोल जावून कठड्यावर आदळल्यामुळे कणकवली हरकुळ येथील युवकाचा सातार्डा येथे अपघाती मृत्यू झाला आहे. ही घटना काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र गोवा सीमा जोडणाऱ्या पुलावर घडली.नितेश एकनाथ कुंभार वय ३१ असे मृताचे नाव आहे. तो आपल्या नातेवाईकांकडे गेला होता. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद यशवंत यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की,दुचाकीस्वाराचा ताबा सुटून दुचाकीची पुलाच्या कठड्यावर धडक बसली.संबंधित तरुण हा २३ मे रोजी डोंबिवली-वेताळनगर येथून आपल्या कणकवली येथील मूळ घरी आला होता.तर शुक्रवारी तो आपल्या कुटुंबियांसमवेत सातार्डा येथील नातेवाईकांकडे आला होता. दरम्यान सायंकाळी तो गोव्यात ज्युपिटर गाडी क्रमांक (जि ए ११ सी १२९१ या दुचाकीने गेला होता. रात्री गोव्यातून सातार्डा येथे येत असताना त्याचा गाडीवरील ताबा सुटून दुचाकीची पुलाच्या कठड्याला जोरदार धडक बसली त्यात तो जागीच ठार झाला. आरोंदा पोलीस स्टेशनचे हवालदार केरकर यांनी या घटनेची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली.याबाबत अधिक तपास सावंतवाडी पोलीस आनंद यशवंते व हवालदार कुडतरकर करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा