You are currently viewing महापूर नशिबाला कोरड घशाला

महापूर नशिबाला कोरड घशाला

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद मुंडे यांचा लेख

सांगली . सातारा. सोलापूर. कोल्हापूर . पुणे. रत्नागिरी. या जिल्ह्यांमध्ये महापूराचा धोका २०१९/२०२०/२०२१ . या वर्षात सर्वाधिक फटका बसला आहे. आणि आत्ता सुद्धा पाऊसाळा सुरू होण्याच्या अगोदर आपणांस व आपल्या कुटुंबाची. जनावरें. व जीवनावश्यक सामान यांची आवरावर करावी लागते आत्तापासूनच राहण्याची व्यवस्था करावी लागत आहे. यासारखे वाईट काहीच नाही पूर येतो किंवा त्याची चाहूल सुध्दा आपणास हलवून सोडते .पूरावेळी नदीला येणारे पाणी सर्वत्र पाऊसच पाउस गावात पाणी. शहरात पाणी. गल्ली बोळात पाणी . घरांत पाणी. उभ्या हातातोंडाशी आलेल्या पिकांत पाणी. सरवत्र चिखल. पूराचया पाण्यातून वाहून येणारा कचरा .मयत व्यक्ती. मयत जनावरे यांच्या कुजण्यामुळे येणारा उग्र वास . पसरणारी दुर्गंधी . यामुळे पसराणारी रोगराई. यामुळे सर्व माणवी जीवन धोक्यात आले आहे .
आपणच केलेल्या अतिक्रमण यामुळे नद्यांची पात्र लहान झाले आहे. आपण म्हणतो पाऊस काळ जास्त असतो. पण आपणं झाड तोडली त्यामुळे पाऊस आणि वातावरण यांवर कुरहाड चालवली त्यामुळे आपल्यावर आज आलेल्या वेळेला आपणच कारणीभूत आहोत.
आला पूर सर्वत्र पाणीच पाणी बघल तिकडं पाणी सर्वजण पाण्याला घाबरून आपला जीव वाचवण्यासाठी पळतात आणि काही दिवसांनी सर्वकाही पूर्ववत होत पाणी कमी होत पाणी नदीच्या पात्रात जात सर्व सुरळीत चालत आणि जसजसे दिवस लोटतील तस पाण्याची पातळी कमी होते. आणि एकवेळ धरणातील बंधारे नदी यामधील पाणी पातळी बघता बघता कमी होते. आणि पाणी टंचाई सारखा भयानक प्रकाराला आपणास सामोरे जावे लागते.
सातारा जिल्ह्यातील काही खेडेगाव. वसाहती ज्या गावापासून लांब राहत आहेत त्यांना आजसुद्धा पाण्यासाठी वाट बघावी लागते आहे म्हणजे नदी उशाला आणि कोरड घशाला असा प्रकार आहे. यामध्ये पूराचे पाणी नियोजन करण्याचे तंत्रज्ञान लोकांना माहिती नाही त्यासाठी लोकांना प्रबोधन संबोधन करणे गरजेचे आहे. या जिल्ह्यातील नेते एक गृहराज्यमंत्री आहेत .
सांगली जिल्ह्यात सुध्दा पूरकाळात मोफत तांदूळ राॅकेल डाळ वाटण्यात आली. कोणाला मिळाली कोणाला नाही. विविध नुकसानभरपाई साठी पंचनामे केले त्याचे पैसे वर्षानुवर्षे लोकांना हेलपाटे मारुन सुध्दा मिळाले नाही. नदीकाठची बरीच गाव पूराचया फटक्याने बेचिराख झाली. काही ठिकाणी लोकांचे जीव गेले त्यांना सुध्दा शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही. सांगली जिल्ह्यातील गावांना इतर दानशूर लोकांनी जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठवली कोणाला मिळाली कोणाला नाही राजकारणी व त्यांचे बगलबच्चे यांनी आपली घर भरली खरोखरच नुकसान झाले त्यांना कोणताही लाभ मिळाला नाही . जिल्हा यांचे पालकमंत्री यावेळी पूरग्रस्तांना मदतीचा आव आणून नदीत सुरक्षित नावे मध्ये बसून सेल्फी काढत होते. चिखलात फिरून फोटो काढत होतें त्यांना लोकांशी कांहीच देणं घेणं नव्हतं याड होत ते म्हणजे निवडणूकीत मतदान कस मिळवता येईल यांचाच
पुराचे मोजमाप प्रामुख्याने दोन प्रकारे केले जाते
भारतातील काही प्रलयकारी पूर
नद्या, नाले, सरोवरे, सागर इत्यादींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन भोवतालचा प्रदेश जलमय होणे, याला पूर म्हणतात. नद्यांना अनेक कारणांनी पूर येतात. अतिवृष्टीमुळे त्याचप्रमाणे नदी हिमाच्छादित प्रदेशात उगम पावत असेल, तर बर्फ वितळून नदीला पूर येतात. नदीच्या मुखाजवळ सागरी भरतीच्या वेळीदेखील पाणी चढते. नदीच्या वरच्या भागातील बांध फुटला, तर तिचे अडविलेले पाणी नदीच्या खालच्या भागात वाहू लागते व आसपासचा प्रदेश जलमय होतो.
उदा., १९६१ मध्ये पानशेत धरण फुटून मोठा पूर आला होता. नदीच्या वरच्या टप्प्यात डोंगराळ भाग असेल, तर भूमिपातांमुळे म्हणजे तेथील कडे वगैरे कोसळून पुष्कळदा नदीपात्रात बांध निर्माण होतात. असे बांध कालांतराने फुटले, तर नदीला पूर येतो. मानवनिर्मित धरणाच्या जलाशयात कडे कोसळल्यामुळे त्या जलाशयातील पाणी धरणावरून वाहू लागते व त्यामुळे नदीच्या खालच्या भागात पूर येतो. उदा., १९६३ साली इटलीतील व्हाइओंट धरणाच्या जलाशयात कडे कोसळल्यामुळे जलाशय पूर्णपणे माती आणि दगडांनी भरून गेला. त्यामुळे जलाशयातील पाणी धरणावरून वाहू लागून नदीच्या खालच्या भागात प्रचंड पूर आला.
पुराच्या वेळी नदीची खननशक्ती बरीच वाढलेली असते. जमिनीचे ढाळमान अधिक असेल, तर पात्राचे अधिक प्रमाणात खनन होते आणि गोटे, वाळू, माती इ. ‘ओझे’ मोठ्या प्रमाणात ती वाहून नेते. ढाळमान कमी असेल, तर पाण्याचा वेग मंदावतो व नदीची ‘ओझे’ वाहण्याची शक्ती कमी होते. नदीच्या पात्रात वाळू, माती, गोटे इत्यादींचे संचयन होते. त्यामुळे पुष्कळदा नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो आणि तिच्या वरच्या भागात पाणी फुगते.
पुराच्या वेळी नदीकाठावरील ज्या भागात पाणी तुंबून राहते, तेथे प्रवाहाचा वेग कमी असल्यामुळे गाळ, माती इ. साठून पुराचे मैदान तयार होते. अशी मैदाने पुष्कळदा अत्यंत विस्तृत असतात. अमेरिकेतील ओहायओ शहराच्या खालच्या भागात निर्माण झालेले मिसिसिपी नदीचे पूरमैदान सु. १२९ किमी. रुंद आहे. तिच्या दोन्ही बाजूंस सामान्यपणे पूरतट तयार झालेले आढळतात. नदीचे पाणी वाढले, की काही वेळा हे पूरतट फुटतात व भोवतालच्या पूरमैदानात पाणी पसरते.
ह्‌वांग हो, मिसिसिपी, पो, गंगा या नद्यांचे पूरतट वारंवार फुटत असल्याने त्यांच्या पूरमैदानांचे अतोनात नुकसान होते. पूरतटांच्याच अडथळ्यांमुळे पूरमैदानात पसरलेले पाणी पुष्कळदा नदीप्रवाहात लवकर परतू शकत नाही; त्यामुळे पुराची अवस्था जास्त दिवस टिकते. १९७८ साली यमुनेला आलेला पूर यामुळेच दिल्ली येथे बरेच दिवस टिकून होता. प्रवाहाच्या वेगात अचानकपणे वाढ झाली, की त्यामुळे पूरतट कमकुवत ठिकाणी फुटतात आणि पुष्कळदा नदीचा उपप्रवाह निर्माण होतो. असा प्रवाह दुसऱ्या एखाद्या नदीला जाऊन मिळाला, की नदीचे अपहरण झाले, असे समजतात. पूरमैदानांत दलदलींचे पट्टे, प्रवाहाची नागमोडी वळणे, धनुष्कोटी सरोवरे इत्यादींची निर्मिती होते.
सागरी किनारपट्टीवरील प्रदेशांत निर्माण होणाऱ्या चक्री वादळांमुळे समुद्रात प्रचंड लाटांची निर्मिती होते. त्या लाटा किनाऱ्यालगतच्या भूप्रदेशात घुसून तो भाग जलमय करतात. अनेकदा अशा चक्री वादळांमुळे किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होऊन तेथील नद्यांना पूर येतात.
असे पूर भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वारंवार संभवतात. १९७० मध्ये बंगालच्या उपसागरात उद्‌भवलेल्या चक्री वादळामुळे गंगेच्या त्रिभुज प्रदेशात मोठा पूर आला होता. अशाच प्रकारची ‘हरिकेन’ व ‘टायफून’ ही वादळे अनुक्रमे वेस्ट इंडीज व ईस्ट इंडीज या बेटांदरम्यान निर्माण होतात. सागरतळाशी भूकंप किंवा ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या लाटांना ‘सुनामी’ लाटा म्हणतात. त्यांच्या निर्मितीमुळेही किनारपट्टीचा भाग जलमय होतो. जपानचा किनारा व पॅसिफिक महासागरातील काही भागांत अशा लाटांची निर्मिती होते.
१८९६ मध्ये निर्माण झालेल्या सुनामी लाटेच्या जपानमधील सु. ११,००० घरे व २७,००० लोकांना तडाखा बसला. १९४६ मध्ये सुनामी लाटांमुळे जपानच्या होन्शू व शिकोकू या बेटांवर पूर येऊन सु. १,००,००० लोक निराधार झाले. इंडोनेशियातील जावा-सुमात्रा या बेटांदरम्यानच्या क्राकाटाऊ बेटावरील १८८३ मधील ज्वालामुखी उद्रेकाने निर्माण झालेल्या लाटा द. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंत जाणवल्या होत्या. त्यांत दोन बेटे नष्ट झाली आणि सु. ३६,००० लोक मृत्यूमुखी पडले. काही वेळा सरोवरांतील पाण्याची पातळी वाढून त्यांच्या आसपासचा प्रदेश जलमय होण्याची शक्यता असते, पण असे प्रकार विरळ असतात. अतिवृष्टीमुळे ऑस्ट्रेलियातील एअर सरोवराची व्याप्ती १९५१ मध्ये ७,५०० चौ. किमी. पर्यंत वाढली होती.
पुराची तीव्रता पर्जन्याचा कालावधी व जमिनीचे स्वरूप यांवर अवलंबून असते. वनस्पतींच्या अडथळ्यांमुळे पुराचा वेग मंद होत जातो व त्यामुळे जमिनीची धूपही कमी होते. तथापि दिवसेंदिवस जगातील जंगलांचे प्रमाण कमी होत असल्याने पुराची तीव्रता व प्रमाण वाढत चालले आहे. अपक्षरण क्रियेमुळे नदीच्या पात्राची जलधारणक्षमता कमी होऊन पुराचे प्रमाण वाढते. पुराच्या वेळी नदीची वहनशक्ती वाढते. प्रवाहाचा वेग दुप्पट झाल्यास वहनक्षमता वेगाच्या ६४ पटींनी वाढते. पुरांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करताना पूराधीन प्रदेशातील जलविज्ञान, मृद्संधारण, पर्जन्यमान, तपमान, आर्द्रता, बाष्पीभवन यांसारख्या गोष्टींचा काटेकोरपणे विचार करावा लागतो.
जमिनीखालून वाहणारे पाण्याचे प्रवाह, त्यांचा वेग, जमिनीची धूप व तत्सम घटकांची आकडेवार व तपशीलवार माहिती गोळा करणे आवश्यक असते. पुराचे मोजमाप करण्याकरिता जलातिप्रवाहाची खोली (डेफ्थ ऑफ ओव्हरफ्लो) विचारात घ्यावी लागते. ही खोली जलौघाचा वेग (रेट ऑफ फ्लो) व पात्राची धारणाशक्ती यांवर अवलंबून असते. किनारपट्टीवरील जलातिप्रवाहाची खोली ही वायुभार, वाऱ्याची तीव्रता व किनारपट्टीची रचना यांवर अवलंबून असते.
** आल पूर आल पाणी गेल पाणी लोकांचे घसे आजून कोरडेच आहेत म्हणजे आपल्याला मिळालेला सर्वात मोठा शाप आहे तो म्हणजे ** पाणी टंचाई टॅंकर मुक्ति होणार का ? सांगली नदीकाठी असूनसुद्धा जिल्ह्यातील काही गावांना अजून सुद्धा टॅंकर पाणी कवठेमहांकाळ. जत . रेठरेधरण. अशी अनेक गावे शिराळा तालुक्यात सुध्दा आहेत. लाखो रुपयांच्या योजना कुठ आहेत. खुदाई आहे पाईप आहे पण पाणी कुठ आहे . पुरवठा केला जातो मग पूराचे पाणी गेल कुठ?
‌ ‌ विदर्भ . उत्तर महाराष्ट्र.मराठवाडा . पश्चिम महाराष्ट्र. या दुष्काळात होरपळून निघणारे विभाग यामध्ये विदर्भात ५०२ मोठं जलप्रकलप आहे. ९२ लघु जल प्रकल्प आहेतः या विभागांत सुध्दा पूर येतो पण आत्ता लोकांना पिणयास पाणी नाही. मराठवाडा ७९४ लघु जल प्रकल्प आहेत.७४९ लघु जल प्रकल्प आहेतः. यापैकी आज ३०७ प्रकल्पा मध्ये पाणी पातळी खाली गेली आहे त्यामुळे लोकांना व जनावरांना पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट आहे . सर्वात सदन साखर आणि वाळू माफिया.शासकिय आणि राजकीय दबाव असणारा नेते पुढारी आमदार खासदार मंत्री याचा किल्ला माणला जाणारा पश्चिम महाराष्ट्र लवकर पूराचा फटका बसणारा चारी बाजूंनी नदी विविध जल योजना. धरण कालवे बंधारे. तरीसुद्धा लोकांचा घसा कोरडाच आहे. पिंपळगाव.वडज . घोड. विसापूर. कळमोडि. वडिवळे. कासार साई. टेमघर.नाझरे. माणिकडोह.येडगाव .डिंबे.चासकमान .भामा.आसखेड . आंध्र . खडकवासला.गुंजवाणी. निरा देवधर.उजणी. कोयना. धोम. कण्हेर. वारणावती.दुधगंगा . राधानगरी.तुळशी. कासारी. पाटगाव. उरमोडी. तारळी. या सर्व जल प्रकल्पाची आज पाणी पातळी खालावली आहे त्यामुळे दुर्गम भागात पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वनवन फिरावे लागते आहे. म्हणजे या सर्व जिल्ह्यांतील पालकमंत्री झोपले आहेत कां?
आत्ता सुद्धा आपल्याकडं पूरपरिस्थिती निर्माण होणार आहे. शासन नदीत कवायती होडी प्रशिक्षण असा फसवा प्रयत्न करुन आम्ही जनतेला वाचवू असा आव आणत आहे . यांवर विश्वास ठेवू नका. आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षा आपणासच करावयाची आहे . शासन कसलीही मदत आपणास करणारं नाही. आपली व्यवस्था आपणास च करावी लागणार आहे.
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

प्रतिक्रिया व्यक्त करा