मालवण :
तालुक्यातील हिवाळे खालची परबवाडी रस्त्याला खड्डे पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा ग्रामस्थांना दिलेला शब्द जि. प. चे माजी वित्त आणि बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी पाळला आहे. डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत या रस्त्याला १० लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून ज्येष्ठ ग्रामस्थ सोमा परब यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
या कामासाठी माजी सरपंच विश्वास परब, विश्वनाथ परब यांनी पाठपुरावा केला. या भूमीपूजन कार्यक्रम प्रसंगी माजी सरपंच चंद्रकांत पवार, रघुनाथ धुरी, उपसरपंच काशिनाथ हिवाळेकर, सोसायटी संचालक काका गावडे, रामचंद्र पवार, जितेंद्र परब, दिपक परब, प्रकाश परब, मंगेश परब, बाळा परब, शंकर धुरी, जयवंत परब, गुणाजी परब, प्रशांत परब, हरिश्चंद्र परब, सुनिल परब, तुकाराम परब, विवेक परब, सुर्यकांत परब, बबन परब, आप्पा परब, बाबाजी परब, अर्जुन परब, दिगंबर परब, गोपाळ परब, तन्मय परब, राजेश परब, अविनाश परब, ओम परब, जयेश परब, पंकज परब, शिवराम परब, शत्रुघ्न परब, सुजल परब उपस्थित होते. सदरील काम सुरु झाल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.