१७७ हेक्टर क्षेत्राचे सर्वेक्षण; सातबारा बंद करून “प्रॉपर्टी कार्ड” देणार…
बांदा
भूमि अभिलेख सिंधुदुर्गच्या वतीने बांदा शहराचे ड्रोनद्वारे सिटी सर्वेक्षण करण्यात आले. तीन टप्प्यात १७७ हेक्टर क्षेत्राचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. या सर्वेक्षणानंतर शहरातील सातबारा बंद होणार असून प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे.
बांदा शहराचे १९८७ मध्ये पहिल्यांदा सर्वेक्षण करण्यात आले होते. शहराचे विस्तारिकरण झाल्याने गावठाण क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे भूमि अभिलेख विभागाच्या वतीने शहराचे ड्रोन सर्वेक्षण करण्याचे निश्चित करण्यात आले.
यावेळी ड्रोन पायलट पंकज म्हस्के, भुकरमापक प्रवीण नायर, ग्रामविस्तार अधिकारी लीना मोर्ये, तलाठी वर्षा नाडकर्णी, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, शामसुंदर मांजरेकर, वरिष्ठ लिपिक संजय सावंत आदी उपस्थित होते.