जिल्हा रुग्णालयात दुसऱ्या ऑक्सिजन प्लांटची उभारणी

जिल्हा रुग्णालयात दुसऱ्या ऑक्सिजन प्लांटची उभारणी

*आ. दिपक केसरकर, आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी*

ओरोस :

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविडचा प्रादुर्भाव वाढत असून  कोविड  रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात दुसऱ्या ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात येत आहे. आमदार दिपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांनी आज याठिकाणी भेट देऊन ऑक्सिजन प्लांट उभारणीच्या कामाची पाहणी केली.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्री. नलावडे उपस्थित होते.

 

कोरोनाच्या पहिल्या लाटेत  रुग्ण संख्या वाढत असल्याने त्यांना लागणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यासाठी जिल्हा रुग्णालयात गेल्या काही महिन्यांपूर्वी ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला. तसेच इतर भागातूनही ऑक्सिजनचा पुरवठा सुरु ठेवण्यात आल्याने  राज्यभर ऑक्सिजनची कमतरता असताना सिंधुदुर्गात मात्र ऑक्सिजनचा  पुरवठा सुरळीत सुरू होता. आता कोरोनाची दुसरी लाट आली असताना अनेक कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे या रुग्णांना देखील ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी जिल्हा रुग्णालयात आणखी एका ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा