You are currently viewing गोठोस नूतन ग्रृप ग्रामपंचायत इमारतीचे २ वर्षांपूर्वी सत्ताधारी शिवसेनेने उद्घाटन केले मात्र गाजाबाजात..

गोठोस नूतन ग्रृप ग्रामपंचायत इमारतीचे २ वर्षांपूर्वी सत्ताधारी शिवसेनेने उद्घाटन केले मात्र गाजाबाजात..

मात्र सध्या इमारत धूळखात पडली ,नेमेके अडलय कुठे स्थलांतरसाठी; ग्रामस्थांमधून मात्र नाराजी..

कुडाळ (गोठोस)

तालुक्यातील गोठोस ग्रृप ग्रामपंचायत नूतन इमारतीचे बांधकाम गेली दोन वर्षांपूर्वी करण्यात आले.फेब्रुवारी २०१९ ला शिवसेनेने अगदी गाजावाजा करीत नूतन इमारतीचे उद्घाटन केले.सध्यास्थित इमारत धूळ खात असे पाहायला मिळत आहे.

जनसुविधा तसेच २५/१५ च्या निधितून १५ लाख खर्च करून या वर्षी इमारत बांधण्यात आले.मात्र अद्यापर्यत नूतन इमारतीमध्ये स्थलांतरित झालेले दिसत नाही.नेमका अडलय तरी कुठे ?असे ग्रामस्थांतून चर्चा पाहायला मिळते.

सत्ताधारी भाजप व विरोध शिवसेना फक्त श्रेय वादासाठी आपापसात उनी धुनी काढताना पाहायला मिळतात.जनतेच्या पैशामधून बांधण्यात आलेली सुसूज्ज इमारत लोकांच्या फायद्यासाठी नसेल तर त्याचा उपयोग काय? संबंधित खात्यातील अधिकारी यांनी तात्काळ लक्ष द्यावा.अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा