दोन सुवर्ण, दोन रौप्य, एक कास्य पदकावर उठवली मोहर : माधुरी खराडे व दिपक कुंभार सुवर्ण पदकाचे मानकरी!
तळेरे: प्रतिनिधी
केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम येथे पार पडलेल्या चौथ्या मास्टर राष्ट्रीय गेम स्पर्धेत सिंधुुदूर्ग जिल्ह्यातील खेळाडुंनी ७ पदकांची कमाई केली असून यामध्ये,दोन सुवर्ण,चार रौप्य, एक कांस्य पदकावर आपली मोहर उमटवली आहे.
माधुरी खराडे- शिक्षिका सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगांव ता. कुडाळ यांनी 55वर्षावरील वयोगटातील पॉवरलीफ्टींग मध्ये 57 किलो वजनी गटात एक सुवर्ण पदक , पाच कि.मी.चालणे प्रकारात एक रौप्य पदक तर 800 मीटर धावणे मध्ये रौप्य पदक, आणि 300 मी. हर्डल्स प्रकारातही त्यांनी कास्य पदकावर मोहर उमटवून तब्बल चार पदकाची लयलुट केली आहे.
तसेच पाट ता.कुडाळ येथील दीपक कुंभार यांनी 4×400 रिले मध्ये सुवर्ण पदक तसेच 400 मीटर धावणे रौप्य पदक असे मिळून एकूण दोन मेडल प्राप्त केली आहेत.तर अनुष्का गावडे पिंगुळी ता. कुडाळ यांनी 400 मीटर हर्डल्स प्रकारात रौप्य पदकासह जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला यश मिळवून दिले आहे.महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व कराताना केरळ येथील राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेत सिंधुदुर्गसारख्या छोट्या जिल्ह्यातील या गुणी जेष्ठ खेळाडूंनी अतिशय उज्वल अशी कामगिरी केली आहे. यामध्ये माधुरी खराडे यांनी पॉवरलीफ्टींग मध्ये आणि दिपक कुंभार रिले मध्ये या राष्ट्रीय स्पर्धेत अव्वल स्थान पटकावून अभिनंदनीय यश संपादन केले आहे.
जिल्ह्यातील या जेष्ठ खेळाडुंचे मास्टर गेम
असोसिएशन सिंधूदुर्ग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अतुल रावराणे, उपाध्यक्ष अनिल हळदिवे, सचिव बयाजी बुराण यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवरांनी आणि क्रीडा प्रेमींनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
पदक विजेत्या तसेच सर्व सहभागी जेष्ठ खेळाडुंचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
तिरूअनंतपुरम: चौथ्या राष्ट्रीय मास्टर गेम स्पर्धेतील पदक विजेत्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जेष्ठ खेळाडुंसोबत संघव्यवस्थापक आणि जिल्हा सचिव बयाजी बुराण