You are currently viewing शासनाच्या जनकल्याणकारी योजना लोककलांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवण्याचा जिल्हा माहिती कार्यालयाचा स्तुत्य उपक्रम

शासनाच्या जनकल्याणकारी योजना लोककलांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवण्याचा जिल्हा माहिती कार्यालयाचा स्तुत्य उपक्रम

– पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी

शासनाच्या दोन वर्षपूर्ती निमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लोककलांच्या माध्यमातून जागर करून योजना जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यात आल्या. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाचा हा स्तुत्य उपक्रम आहे. शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी एक महत्वाचे योगदान ठरले आहे, असे गौरवौद्गार पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले.

            शासनाच्या दोन वर्षपूर्ती निमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील 63 गावांमध्ये शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लोककलांच्या माध्यमातून जागर करण्यात आला होता. याचा प्रसिद्धी अहवाल पालकमंत्री श्री. सामंत यांना सादर करण्यात आला होता. हा अहवाल  पाहून पालकमंत्री श्री. सामंत यांनी जिल्हा माहिती कार्यालयाच्या पथकाचे आणि या उपक्रमाचे कौतुक केले. राज्य शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि क्षेत्रीय स्तरावर जिल्हा माहिती कार्यालय विविध माध्यमांचा वापर करून योगदान देत असतात. यावर्षी पारंपरिक लोककलांच्या माध्यमातून शासनाच्या योजनांचा जागर गावागावात करुन थेट जनसामान्यांशी संवाद साधण्याचा उपक्रम राबवून प्रभावी कौशल्य हाताळले आहे.  त्याचबरोबर त्याचा अहवाल जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना देवून वेगळा पायंडा पाडला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक करून त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन करतो, यापुढेही निश्चितच हा संवाद आणखी प्रभावशाली होईल त्यासाठी निश्चितच पारंपरिक माध्यमांबरोबरच सोशल माध्यमांचा सहजतेने वापर होत आहे. त्यासाठी ही शुभेच्छा देतो, असेही पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा