सिंधुदुर्ग मुख्यालयात 16 जूनला कोविड सेंटरचे उद्घाटन

सिंधुदुर्ग मुख्यालयात 16 जूनला कोविड सेंटरचे उद्घाटन

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या प्रयत्नांना यश

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अमित सामंत यांच्या प्रयत्नामुळे सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी होमगार्ड ट्रेनिंग सेंटर येथे सुरू होत असलेल्या कोविड सेंटरचे उद्घाटन बुधवारी १६ जूनला राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री उदय सामंत, राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, आज जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी कोविड सेंटरच्या नियोजित जागेची पाहणी केली.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.श्रीपाद पाटील, जिल्हा फार्मासिस्ट अनिल कुमार देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोगटे, अनंत पिळणकर, शिवाजी घोगळे, युवक राष्ट्रवादी काँ. कुडाळ मालवण विधानसभा अध्यक्ष सर्वेश पावसकर, जिल्हा सरचिटणीस ॲड. हितेश कुडाळकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाताडे, विद्यार्थी सेल जिल्हाध्यक्ष प्रतीक सावंत,कणकवली विधानसभा अध्यक्ष देवा पिळणकर, कणकवली तालुका अध्यक्ष सागर वारंग, कुडाळ उप शहराध्यक्ष प्रकाश वेंगुर्लेकर, शहर सरचिटणीस केदार भोसले आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा