You are currently viewing सावंतवाडी कामगार कल्याण केंद्रात बालवाडी व शिवण वर्ग प्रवेश प्रक्रिया सुरू…

सावंतवाडी कामगार कल्याण केंद्रात बालवाडी व शिवण वर्ग प्रवेश प्रक्रिया सुरू…

सावंतवाडी

येथील कामगार कल्याण केंद्रात यावर्षीची बालवाडी व शिवण वर्ग प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येथील जिमखाना मैदान परिसरातील पालिकेच्या इमारती हे वर्ग सुरू होणार आहेत. तरी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन केंद्रप्रमुख नम्रता आराबेकर यांनी केले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले.

त्यात असे नमूद करण्यात आले आहे की , येथील कामगार कल्याण केंद्रामार्फत बालवाडी व शिवण वर्गाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिमखाना मैदानावरील नगरपालिकेच्या इमारतीत हे वर्ग सुरू होणार आहेत. त्यासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून अधिक माहितीसाठी ९४२१२६४८००, संचिता सावंत ८२७५६५२३६९, उमा पांचाळ ९४२०२७०२०९ या नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन केंद्र प्रमुखांकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा