You are currently viewing नांदगाव येथील एका सर्व्हिस रोडचे काम सुरू

नांदगाव येथील एका सर्व्हिस रोडचे काम सुरू

90 शेतकऱ्यांना मोबदलासंदर्भात नोटीस बजावली

कणकवली

मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील ओटव फाटा व नांदगाव तिठा येथे दोन्ही पुलाजवळील एक साईट सर्व्हिस रोड संदर्भात प्रश्न अद्याप सुटलेला नव्हता . जवळपास तिन वर्षे प्रलंबित असलेल्या ओटव फाटा ब्रिज जवळील एका साईड सर्व्हिस रोड चे नुकतेच काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान एकूण 90 शेतकऱ्यांना मोबदला संदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे.अजूनही पैसे वर्ग होणे बाकी असले तरी ही जमिन मालक असलेले व ज्यांनी अनधिकृत पणे लोकांच्या जमिनी मधे घुसून सर्व्हिस रोड करत असताना काम बंद पाडले होते त्या नागेश मोरये यांनी आता शेतकर्याना अंतिम मोबदला संदर्भात नोटीस बजावण्यात आल्याने व अपघात टाळण्यासाठी परवानगी दिली आहे.

सदर सर्व्हिस रोड चे काम सुरू करण्यात यावे मात्र कच्च्या रस्त्याची आखणी करण्यात यावी व ज्यावेळी सर्व शेतकऱ्यांना मोबदला वर्ग होईल तेव्हा डांबरीकरण व गटार व्यवस्था करण्यात यावी अशा अटीशर्तीवर परवानगी देण्यात आली आहे. ओटव फाटा ब्रिज जवळील सर्व्हिस रोड होत असला तरी नांदगाव तिठा येथे एकाच बाजूने सर्व्हिस रोड आहे.येथून नांदगाव तिठा व देवगडच्या दिशेने जाण्यासाठी वाहने उलट दिशेने न्यावी लागत आहे.यामुळे नांदगाव तिठा येथील ही सर्व्हिस रोड संदर्भात प्रश्न लवकरच मार्गी लागणे अत्यंत आवश्यक आहे.

नांदगाव तिठा येथील जमिन मालक रोहन नलावडे यांना जमिन संदर्भात नोटीस बजावली आहे मात्र त्यांची चिरेबंदी असलेली शेड सुध्दा या सर्व्हिस रोड मधे बाधीत होणार असल्याने या शेडची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.मात्र या शेड संदर्भात प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्याची नोटीस बजावण्यात आली नाही. चार दिवसांपूर्वी संबंधित यंत्रणांनी अचानक नांदगाव येथे हायवेवर गतिरोधक बसविले होते आणि यात अपघात होवून महीलेचा नाहक बळी गेला होता. यानंतर काही काळ संतप्त नांदगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी महामार्गावरील वाहतूक रोखली होती अपघाता नंतर जवळपास रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरू होते.

या सर्व पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी कणकवली येथे आमदार नितेश राणे यांनी आढावा बैठक घेऊन दुसऱ्या दिवशी नांदगाव येथे भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली होती .व तातडीने उपाययोजना करावी अशी सूचना केली होती. तसेच जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतिश सावंत यांनीही या अपघात पार्श्वभूमीवर नांदगाव येथे भेट देत पाहणी केली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा